# @imharshaddhage on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/C8FbdRFIEeV
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/61322947-imharshaddhage-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/413cf056ce.jpg
- **Posted:** 2024-06-11T18:05:15.000+00:00
- **Account Owner:** Harshad Dhage (@imharshaddhage) — https://gondola.cc/imharshaddhage

## Caption

जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच मीरा भाईंदर महानगरपालिके कडून झाडांची बेसुमार कत्तल, 
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. पर्यावरण दिन हा प्रत्येक महापालिकेकडून साजरा करत झाडे लावली जातात तसेच झाडांचे रक्षण करणे, झाडे लावणे अशी जनजागृती केली जाते. परंतु मीरा भाईंदर महापालिका याला अपवाद आहे. मीरा भाईंदर महापालिका उद्यान विभागाने काशीमीरा परिसरात पर्यावरण दिनाच्या दिवशीच सकाळी- सकाळी मोठं मोठी झाडांची कत्तल केली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमीनी संताप व्यक्त करत पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी जिवंत जुन्या झाडांची बेसुमार पणे कत्तल करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन व संरक्षण अधिनियम १९७५ आणि महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ व वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम, २००९ सह शासन आदेश, अधिसूचना नुसार त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

#TreeCutting #SaveTreeSaveCity #MBMV #EnvironmentDay
cmomaharashtra_ mahadgipr mahaforestofficial mahaenvcc adityathackeray unep mieknathshinde maharashtratourismofficial mpcb_official climatereality connectgeeta pratap_sarnaik purveshpratapsarnaik nareshmhaskeofficial mygovindia sanjay_shripatrao_katkar thebetterindia.marathi

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 42
- **Shares:** 0
- **Comments:** 0

## Tags

treecutting, mbmv, environmentday, savetreesavecity

---
Copyright (c) Gondola