# @official.nishabd on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DS-BoNXCMno
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/61582577-officialnishabd-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/c174ed1f98.jpg
- **Posted:** 2026-01-01T13:09:46.000+00:00
- **Account Owner:** Nishabd | निशब्द (@official.nishabd) — https://gondola.cc/official.nishabd

## Caption

Welcome 2026...

2025...
तुझ्याबद्दल काही तक्रार तर नाही... 
फक्त एक खंत राहिली... 
की तू ओंजळ रिकामी ठेवलीस...
तू काय दिलं, काय घेतलंस
याचा हिशोब करण्याचं मन तर आहे, 
पण तो हिशेब मी आता करणार नाही... 
तू मला खूप वेळा पाडलंस, 
पण आता २०२६ पासून पुढे मी पडणार नाही... 
भावनांचा बाजारात तू खूप लिलाव केलास, 
मलाही भावनांचा खूप गुलाम केलास... 
आतापर्यंत फक्त सजत होतो, 
पण तू खरा आरसा दाखवलास... 
माझ्या असण्याचा आणि नसण्याचा 
मला खरा अर्थ शिकवलास... 
कधी बेफिकीर ठेवलंस तू मला, 
तर कधी घाबरलेला, भीतीमधे ठेवलंस... 
कधी माझा रुतुबा उंचावलास, 
तर कधी मला चक्क मातीत पडलंस... 
जाता जाता तू शून्याचाही, 
खरा अर्थ सांगून गेलास... 
लख्ख नजर आणि खरी पारख देऊन गेलास... 
कितीही तू मला तोडलंस-मोडलंस, 
पण मी नेहमी नशिबाशी दोन हात करणार... 
तू तर एका रात्रीत बदलून गेलास दूनिये सारखाच,
पण माझ्यातला 'मी' कधीच नाही बदलणार...
माझ्यातला 'मी' कधीच नाही बदलनार...

© निशब्द | Nishabd

#निशब्द #writersofinstagram #poem #viral #explore

## Stats

- **Views:** 52
- **Likes:** 1
- **Shares:** 0
- **Comments:** 1

## Tags

explore, writersofinstagram, viral, poem, निशब्द

---
Copyright (c) Gondola