# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DXCXFYLiO_f
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336638-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/7fbed8b31c.jpg
- **Posted:** 2026-04-12T15:46:47.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

आज आमने सामने हे बालगंधर्वला नाटक पाहिले. काय कमाल सुंदर नाटक आहे. कथानक जेवढे ताकदीचे त्यालाच तोडीस तोड इथले कलाकार आहेत. शिवाय काय कमाल ऑडियंस होता, प्रेक्षक जेवढा चांगला तेवढी नाटकाला रंगत येते आणि तसेच काहीसे झाले. खरतर नाटकही हाऊसफुल होतेय हे खूप आश्वासक वाटले. केवळ हेच नाही रविवारची सगळी नाटके हाऊसफुल होती. काय सुंदर गोष्ट आहे हो! आणि ज्याप्रमाणे नाटकात म्हटले तसे “हे नाटक कमी आणि अनुभवावर आधारित जास्त असणार आहे “ त्यामुळे जेवढी स्क्रिप्ट एंगेजिंग तेवढाच प्रेक्षकवर्ग खुश 😄 लिना भागवतची तर एनर्जी म्हणजे एनर्जी आहे बॉस! शिवाय आवाजातले उतार चढाव म्हणजे खरी मेजवानी 😍 मंगेश कदम यांनी तर जुन्या पिढीच्या जुन्या विचारांचा जसा राग यावा तशी खणखणीत एक्टिंग केली. रोहन आणि केतकी तर इंस्टाग्रामच्या रीलमुळे अतिशय आवडीचे होते पण आजच्या नाटकात त्यांनी जणू आमचीच पात्र साकारली इतकी आपली वाटतात दोघेही 🫶 एकंदरीत नाटक सुपरहिट आहेच… मराठी प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळवण्याचा सुवर्णकाळ सुरू झालाय 😍 जमले तर नक्की आपल्या फैमिली बरोबर जाऊन याचा अनिभव नक्की घ्या  #pdheringe #aamanesamane

## Stats

- **Views:** 4,100
- **Likes:** 249
- **Shares:** 0
- **Comments:** 3

## Tags

aamanesamane, pdheringe

---
Copyright (c) Gondola