# @pdheringe on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DWOk7wniE_k
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336681-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/c8cbec34ce.jpg
- **Posted:** 2026-03-23T12:59:44.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

लग्न हा मुला, मुलीच्या आयुष्यातला दुसरा जन्म असतो. ज्याप्रमाणे आयुष्याचे पंचवीस तीस वर्षे ते अविवाहित म्हणून जगताना शिकत असतात तसाच अनुभव लग्नानंतर येणार असतो... ज्याप्रमाणे आईच्या पोटातून जन्मल्यानंतर त्यांना एक कुटुंब मिळतं आणि त्या कुटुंबातून अनेक दिशा आणि आधार मिळत जातात. लग्नानंतर सुद्धा नवं कुटुंब, नवी नाती जुळत जातात. बदल एवढाच होतो की अचानक वयाच्या काही वर्षांनंतर नवे चेहरे आयुष्यात येतात. जे नकळत आपल्या आयुष्यात बदल घडवणार असतात. 
काही मुलं, मुली तितके परिपक्व नसल्यामुळे बहुतांश वेळा कुटुंब हे त्यांच्या आयुष्यात प्रमुख भूमिका निभावतात. ज्याचे चांगले, वाईट परिणाम त्या जोडप्याला भोगावे लागतात. बऱ्याचदा समाजातल्या इतर मुलींना पाहून त्यांच्यासारखं आपल्या घरी येणाऱ्या मुलीने वागू नये या भीतीने बंधनांची लिस्ट थोपवली जाते. तसचं बऱ्याचदा समाजाने मुलाला ‘ बायकोच्या हाताखालचा बैल’ हा शब्द वापरू नये म्हणून स्वतःच्या बायको पासून चार हात दूर ठेवलं जातं. नाहीतर लग्नाआधी नोकरी, शिक्षण करणाऱ्या मुलीला धुणी, भांडी, स्वयंपाकात बळजबरीने ढकलले जाते. मुलाला त्याच्या बायकोशी निश्चिंत कम्युनिकेशनची मुभा दिली जात नाही. लग्नानंतर अस्तित्व विसरून जगावं लागेल असं मुलींनी जगू नये. तो काळ गेला असं म्हणत असलो तरी भारतात ९९% घरांत आजही मुलगी घरेलु दबावाखाली जगते आणि मुलांना कौटुंबिक आणि सामाजिक नजरेत पुरुषाची गादी अबाधित ठेवायची म्हणून भावनाशून्य आयुष्याचे धडे दिले जातात. त्या दोघांच्या जगण्यावर बंधनं लादू नये. कुटुंब हे बहुतांश वेळा समाजाच्या दृष्टीने निर्णय घेतं. कारण त्यांची त्या जोडप्याबरोबर तेवढी इमोशनल बाँडींग नसते. त्यामुळेच समाजाच्या दृष्टीने होतो तो व्यवहार, नातं तर प्रत्येकाचं मन समजुन घेऊन निर्माण होतं. 
नवरा बायको मात्र एकमेकांसोबत नाही म्हटलं तरी स्पर्शाने अजाणतेपणी बोललेले असतात, फील केलेलं असतं आणि हो, स्पर्श खूप जास्त बोलतो. त्यामुळे त्यांना जे एकदुसऱ्यासाठी वाटतं ते खूप आत्मीयतेने (उर्वरीत भाग कमेंटमध्ये आहे) #lagn #लग्न #indianwedding #marriage

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 1,878
- **Shares:** 0
- **Comments:** 22

## Tags

marriage, lagn, indianwedding, लग्न

---
Copyright (c) Gondola