# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DUIA8b0iY9p
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336859-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/f364ba30ed.jpg
- **Posted:** 2026-01-30T06:56:50.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

VC- @adiityaa_19  खूपच सुंदर प्रयत्न👏 दादा गेल्यापासून दादांबद्दल खूप ऐकायला, वाचायला मिळाले. आपल्या महाराष्ट्रात माणूस गेल्यावरच “मोठा” होतो, ते खर्या अर्थाने पाहिलं पण त्या सगळ्यात हा व्हिडिओ, त्यामागील आवाज काळजाला भेदून गेला. नव्या तंत्रज्ञानाचा वापर माणूस गेल्यावरही त्याच्याशी संवाद घडवून आणू शकतो. हो मान्य आहे गेल्यानंतर त्याचं “अस्तित्व” तंत्रज्ञानाने टिकवून ठेवता येत नाही. पण काही काळासाठी, काही माणसांसाठी प्रेरणेचा स्रोत टिकवून ठेवू शकतो. 
झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये इतरही लोक मृत पावली. अनेकजण म्हणतात मग केवळ दादांच्याच नावाने का टाहो फोडला जातोय. याचे उत्तर गेल्या दोन दिवसात मिळाले असेलच. दादा उपमुख्यमंत्री तर होतेच पण सत्तेत असू तर लोकांसाठी काम करू शकू हा त्यांचा मंत्र खूप फायद्याचा ठरला. वयाची सहासष्टी गाठलेला माणूस काळाच्या शर्यतीत नेहमीच स्वतःला टिकवून ठेवत आला आणि हेच कारण आहे आजची पिढी सुद्धा दादांसाठी हळहळत आहे. यापुढे जाऊन एक मोठा वर्गही आहे जो दादांसाठी रडतोय. असा वर्ग ज्यांची कुठलीतरी कामे दादांच्या भरोसे पुरी होणार होती. दादांच्या एका सहीने गोष्टी सोप्या होणार होत्या. दादा बारामतीत पोहोचल्यानंतर त्या दिवसात अनेकांचे आयुष्य सुधारणार होते. पण त्यांची गरज पूर्ण झाली नाही म्हणून जास्त गहिवरून येत असणार. याची दुसरी बाजू म्हणजे अशी कामे पूर्ण करून अनेकांची आयुष्य सोपी केली  असतील. अनेकांना बक्कळ पैसा कमावून दिला असेल. माणूस कामाचा होता म्हणूनच अनेकांच्या जीवनात महत्वाचे स्थान निर्माण करून गेला. त्यांच्या जीवनावर आधारित ही क्लिप खूप गोष्टींचा सार सांगते आणि मागे राहिलेल्या त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला बळ देते. #ajitpawar #ajitpawarspeaks #ajitpawarplanecrash #viral #trend

## Stats

- **Views:** 4,578
- **Likes:** 375
- **Shares:** 0
- **Comments:** 4

## Tags

ajitpawar, viral, trend, ajitpawarplanecrash, ajitpawarspeaks

---
Copyright (c) Gondola