# @pdheringe on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DTDE8IHiWyb
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336863-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/c10db52979.jpg
- **Posted:** 2026-01-03T12:12:04.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

गुहेतील आयुष्य जगण्याचा अनुभव देणारा अलंग मदन कुलंग ट्रेक ! 

एखाद्या ठिकाणाने आपल्याला बोलवायला लागते आणि तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जाणे शक्य होते नाहीतर प्लानिंग वगैरे गोष्टी फोल ठरतात. 
तसाच काहीसा प्रकार माझ्यासोबत अलंग मदन कुलंग (एएमके) गडाचा ट्रेक करण्याच्याबाबतीत घडला. बऱ्याचदा ठरवूनही मुहूर्त लागत नव्हता आणि त्यामुळेच गेल्या २-३ वर्षात ४-५ वेळा रतनवाडी गावात येणं झालं. ओघाने रतनगड, हरिश्चंद्रगड, भीमाशंकर फिरणे झाले पण एएमके ट्रेक नेहमीच भीतीमुळे असेल किंवा जास्त वेळ लागतो म्हणून असेल नेहमीच टाळला गेला. पण यावेळी २ आठवड्यापूर्वी रतनगडच्या ट्रेकदरम्यान अखेर ठरवलेच की हिवाळा संपायच्या आणि उन्हाळा लागायच्या आधी हा ट्रेक कुठल्याही परिस्थितीत करायचाच. त्यानुसार कदाचित एएमकेनेही मनाशी पक्के केले आणि सांगावा धाडला. ठरल्याप्रमाणे नियोजन झाले. सकाळी ७ वाजता ट्रेकचा श्रीगणेशा झाला. ही ट्रेकिंग कठीण श्रेणीतील असल्यामुळे गर्दी टाळून ट्रेकिंगसह शुटिंग करायची म्हणून शुक्रवारचा दिवस निवडला आणि शुक्रवारच्या सकाळी ४ मित्रांच्या सोबतीने स्वारी निघाली अलंगच्या दिशेने… 
दुर्ग त्रिकुट म्हणजेच ३ गडांचा हा समूह! बरेच ट्रेकर्स, गडप्रेमी, दुर्गवेडे वेळेअभावी किंवा अवघड असल्या कारणाने एकच गडावर जाऊन परतीस निघतात. पण यावेळी माझं मनाशी ठरलच होतं. आपल्या शरीराची क्षमता ओळखायची. शरीराच्या शेवटच्या पातळीपर्यंत जाण्याचा सवाल नव्हता पण आपल्यात किती ताकद आहे आणि स्टॅमिनासह आपण mind Over Body हे खरे करून दाखवू शकतो का पाहायचे होते. विचारांची मैफल जमवून तासनतास बसणाऱ्या जमातींना माझ्या या वाक्याचा अर्थ लवकर कळेल. 
बऱ्याचदा आपण मनाप्रमाणे शरीराला वागवतो. मग शरीराच्याही आधी मन येते. पण भटकंती करताना मनाने आपल्याशी संवाद साधला तर ट्रेक सोप्पा होतो पण जर आयुष्यातल्या कठीण घटनांचा चर्चावाद सुरू असेल तर नेहमी मन बाजी मारते आणि त्याचा ताण शरीरावर येऊन ट्रेक सर करायला कठीण जातो. 
मात्र त्यामुळेच ही वेळ शरीराला 
(उर्वरित भाग कमेंटमध्ये देत आहे) #alangmadankulang #amktrek #gadkille #viral #algorithm

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 482
- **Shares:** 0
- **Comments:** 16

## Tags

viral, algorithm, alangmadankulang, gadkille, amktrek

---
Copyright (c) Gondola