# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DU_CD25iRLy
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336966-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/7cffe5e4fa.jpg
- **Posted:** 2026-02-20T15:34:14.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

पहिलं प्रेम, पहिली मैत्रीण, पहिली नोकरी…
पहिल्यांदा होणाऱ्या सगळ्याच गोष्टी 
मनात स्पेशल जागा करून जातात…

कॉर्पोरेट सोपं नाहीये, 
कारण इथेही एक राजकारणी क्षेत्र आहे! 
त्यातल्या त्यात मला “माझ्यासोबत” राजकारण करणारी माणसं भेटली नाही, यातच धन्य झाले ☺️

कॉर्पोरेट जगाशी ओळख करून देणाऱ्या पहिल्या नोकरीचा आज शेवटचा दिवस… डोळे गच्च भरलेले, कोणत्याही क्षणी अश्रूंचा महापूर उसळणार अशी अवस्था, कित्येक जुन्या आठवणींची गाठ सोडून त्यावर गप्पा, मन भयानक उदास, नव्या संधीच्या चर्चा, आणि आपल्या एमडीपासून ते जनरल मॅनेजरपासून ते मॅनेजर, एचआर पासून ते मित्र मैत्रिणींच्या डोळ्यांत आपल्यासाठी असलेला निस्वार्थ आपुलकीचा भाव…! 

कालपर्यंत ज्या जागेबद्दल एवढ्या तक्रारी होत्या त्या नाहीशा होऊन सगळच अचानक आपलं वाटू लागलं. 

ती नोकरी जिच्यामुळे माझ्या कल्पनेतल्या स्वप्नांना बळ मिळालं, 
जिच्यामुळे बसने प्रवास करण्यापासून ते गाडीने जाण्याचा प्रवास गाठला…
जिच्या जोरावर आयुष्यातली पहिली कार घेण्याची हिम्मत केली,
ती नोकरी जिच्यामुळे स्वतःला “स्वतंत्र स्त्री” म्हणताना आत्मविश्वास आला…

लोक म्हणतात, अशा अनेक नोकऱ्या येत जात राहता. नोकरीचे गुलाम व्हायचं नाही. मान्य आहे खूप कंपन्यांमध्ये आजही गुलामीची वागणूक दिली जाते पण किमान ज्या कंपन्या बैलेंस साधतात त्यांच्याबद्दल आणि आपल्याला सुखकर आयुष्य देणाऱ्या नोकरीबद्दल कद्धीच कृतज्ञ असायचे नाही का ? 

आज “कॉलेजनंतर जॉब कधी लागेल या धाकधुकीत असणारं” अस्वस्थ मन भेटलं. चर्चा बऱ्याच झाल्या. पण भावनांची धावपळ सुरूच राहिली. अचानक आनंदाश्रू तर अचानक उद्यापासून हे सगळं काहीच नसणार या जाणिवेने मन उदास झालं. वर्तमानातले सगळेच भूतकाळात जमा होण्याचा कोवळा क्षण होता. सगळ्यांना आपल्या बद्दल वाटणारी नाजूक भावना आपल्यापर्यंत पोहोचल्याचा तो क्षण! 
आपण माणसं भले करामती असतो! 
“एरवी रूटीनला कंटाळतो आणि निरोपाची वेळ झाली की त्यालाच कवटाळतो!”
चला… एक सूर्यास्त झाला… 
उद्यापासून नव्या ठिकाणाहून सूर्योदय पाहण्याची तयारी करायला हवी ♥️
#firstjob #nokri #naukri #viral #life

## Stats

- **Views:** 2,827
- **Likes:** 299
- **Shares:** 0
- **Comments:** 11

## Tags

naukri, viral, life, firstjob, nokri

---
Copyright (c) Gondola