# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DSSrfo8Eg0Q
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63337236-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/9ca4be504e.jpg
- **Posted:** 2025-12-15T17:07:38.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

तेरे इश्क़ में चित्रपट पाहून २ आठवडे झाले. तसा सिनेमा अपेक्षितपणे वळण घेणारा आहे पण सिनेमातील शंकर (धनुष) आणि वडील राघव गुरुक्कल (प्रकाशराज) यांची जोडी डोळ्यात पाणी आणि मनात घर करून गेली.
हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला सिनेमातले काही ना काही आवडले असणार. काहींना क्रिती सॅननची एक्टिंग आवडली तर काहींना धनुषमधील अल्फा मैन भावला, काहींना सिनेमाची कहाणी आवडली तर काहींना गाण्यांची भुरळ पडली पण माझ्यासारख्या अनेकांना बाप लेकाची जोडी आवडली असेल आणि त्यामुळेच जेव्हा रांझणामधील कुंदनचा मित्र मुरारी शंकरचे वडिल मरतात तेव्हा म्हणतो, देख तेरा बाप तेरे इश्क़ में जल गया| हे ऐकताना असह्य वेदना होतात. 
सहज वाटते की, आपण मोठं होताना तरणेपणाचे सगळे प्रसंग जगत असतो. आपल्या अल्लड आणि नव्या जगण्यात आपल्या आई वडिलांचा रोल किती ग्राह्य धरला जातो. ते आपल्या सवयीचे झालेल्या भूमिकेत असतात. ऊन, वाऱ्यासारखे आणि बऱ्याचदा आपल्या शरीरासारखे! ते असतात पण त्याची जाणीव नसते. आपण किती व्यस्त असतो— कॉलेज, प्रेम, करियर ! 
आणि कसय ना आपल्या आईवडिलांच्या पिढीला नाही माहीत हो की करियरला वेळ द्यावा लागतो. या जीवघेण्या स्पर्धेत माणूस स्वतःचा पण राहिलेला नसतो आणि दुर्दैवाने हे सगळच इतकं नवीन आहे की ही मनाची घालमेल आपल्यालाही मांडता येत नसते. 
नशिबाने शंकरच्या भूमिकेतला धनुष अजूनतरी करियरच्या स्पर्धेत नाही गुंतलाय. पण प्रेमाने त्याची चांगलीच परीक्षा घेतली आहे पण या परीक्षेत सिंगल डैड दाखवलेले त्याचे वडील - प्रकाशराज कम्माल आहे. ते त्याचे मित्र तर होता पण वेळेवर आईही होतात. काहीही होवो पण ते त्याच्या सोबतीलाच राहतात. आई वडील म्हणजे श्वास नसतात पण शरीर असतात. त्यांच्या असण्याने आपलं आयुष्य उघड्यावर येत नाही. 
आपण प्रेमाच्या इश्कात मरायला तयार असतो. पण मोठेपणी त्यांच्यासाठी- त्यांच्यासोबत जगणं खरं जगणं आहे, हे जाणवतं.
बनारस घाटावर झालेला हा संवाद माझ्या मनात घर करून राहीला आणि आयुष्यभर राहील. माझ्यासाठी तेरे इश्क में सिनेमा म्हणजे बाप लेकाचं एकमेकांबरोबर मनसोक्त असणं आणि बापानेही मुलाच्या त्या वयातील सगळ्या महत्वाच्या वाटणाऱ्या घटनांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवणे. 
असे सिनेमे आपल्यातल्या त्या नाजूक नात्यांना धार देतात ज्यांचा विसर पडलेला असतो. त्यामुळेच कलेत संवेदना जागवण्याची ताकद असते, ते खरेच आहे! #tereishqmain❤️ #kritisanon #dhanush #prakashraj #sondad #sondadmovie

## Stats

- **Views:** 26,777
- **Likes:** 595
- **Shares:** 0
- **Comments:** 10

## Tags

sondad, sondadmovie, prakashraj, tereishqmain, kritisanon, dhanush

---
Copyright (c) Gondola