# @pdheringe on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DQkNN66Ex0F
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63337380-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/ec5b6e3ef2.jpg
- **Posted:** 2025-11-02T19:25:09.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

वुमन वर्ल्ड कपचा हा विजय येणाऱ्या अनेक विजयांची नांदी ठरेल ! भारताने महिला विश्वचषकात आपले नाव कोरून महिलांच्या क्रिकेटची चर्चा सुरू केली. ही चर्चा वाढत जावी. मुलींमध्ये क्रिकेटचे वेड वाढो म्हणजे अशा अनेक मुली आहेत ज्यांना क्रिकेटची आवड आहे पण मेल डॉमिनेटेड फिल्ड म्हणून याकडे पाहिले गेले आहे त्यामुळे कित्येक मुली त्यांच्या या पॅशनला पुढे नेत नाही. शिवाय घरचेही या गोष्टीला जास्त महत्व देत नाही आणि त्यामुळेच असे विजय खूप महत्वाचे ठरतात. चर्चा घडवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि किमान सतत म्हणण्यासाठी “म्हारी छोरियां छोरों से कम है के”
महिला क्रिकेटला अधिकाधिक महत्त्व येणारा हा काळ आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला क्रिकेटची तुलना होणे साहजिक आहे. पण २०१७ नंतरचे मळभ दूर झाले आणि दीप्तीने घेतलेल्या विकेट असो किंवा हरमनप्रीतने घेतलेली शेवटची कैच! शेफाली वर्माची खास बॅटिंग आणि २ विकेट सगळच कौतुकास्पद आणि माझ्यातल्या क्रिकेटप्रेमीला आनंद देणारं ठरलं. ग्राउंडवर जेवढ्या खेळाडूंनी चेंडू झेलताना चूक केली त्याची जबाबदारी घेऊन विरुद्ध पक्षाच्या विकेट घेऊनच त्याचे उत्तर दिले. गर्व, अभिमान आणि उर आनंदाने भरून आला.
मॅच झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या तोंडून मोठ्या संख्येने आलेल्या फॅनने/ क्राऊडने केलेले चीअर त्यांच्यासाठी किती महत्वाचे ठरले हा सूर होता. म्हणजे त्यांना जाणीव आहे त्या आज ज्या खेळासाठी लढताय त्यांच्या या विजयाने भविष्यात भक्कम खेळाचा पाया रचला जाणार आहे. त्यामुळे ग्राउंडवर खेळूनच त्यांना याचे उत्तर द्यायचे आहे. लोकांना पटवून द्यायचे आहे की, हा खेळ जेंडर डॉमिनेंट नसून सगळ्या क्रिकेटप्रेमींचा आहे. हळूहळू ही परिस्थिती नक्की बदलेल. या दरम्यान एक फोटो असाही वायरल होतो की काही वर्षांपूर्वी याच नवी मुंबईतील स्टेडियमला असलेल्या वुमन कप वेळी आलेला क्राउड आणि आताचा वुमन वर्ल्ड कपसाठी आलेला फैन क्लब यातील तफावत! आताचा ग्राउंडवरील दणाणणारा आवाज वाढत जावो हीच मनापासून इच्छा! Congratulations Girls 🥳 
#pdheringe 
#iccwomensworldcup2025 #womensworldcup2025 #womensworldcup #algorithm

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 241
- **Shares:** 0
- **Comments:** 7

## Tags

womensworldcup, algorithm, iccwomensworldcup2025, pdheringe, womensworldcup2025

---
Copyright (c) Gondola