मिरा-भाईंदरमध्ये झाडांची कत्तल थांबवा! mbmconline
‘फॉर फ्युचर इंडिया’ संस्थेने मिरा-भाईंदर महानगरपालिकेद्वारे वृक्ष छाटणीच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शहरात झाडांना अक्षरशः ‘नागडे’ केले जात असून, ही ‘छाटणी’ नसून ‘कत्तल’ आहे.
🌳 मुख्य मुद्दे:
अमानवी छाटणी: अनेक झाडांवर एकही पान नाही, जिओटॅग फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
नियमबाह्य ठेका: ‘वजनानुसार’ पैसे देण्याच्या ठेक्यामुळे बेकायदेशीर तोड सुरू.
कायद्याचे उल्लंघन: महाराष्ट्र वृक्ष संरक्षण अधिनियम १९७५, BNS आणि NGT च्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन.
ट्री ऑफिसर गैरहजर: छाटणीवेळी जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते.
गंभीर परिणाम: वाढते प्रदूषण, तापमानवाढ, पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त, पर्यावरणाचा विनाश.
⚡️ forfutureindia ‘फॉर फ्युचर इंडिया’ची मागणी:
तात्काळ चौकशी करून बेकायदेशीर छाटणी थांबवा.
दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करा.
नुकसान भरपाई घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा.
१५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करा.
आपल्या शहराचे हिरवेपण वाचवण्यासाठी एकत्र या! आवाज उठवा!
#MiraBhayandar #TreeProt...