मॅंग्रोव्ह झाडावर विषबाधा करून त्यांची बेसुमार कत्तल ; ५० मीटरचा बफर झोन न-लागण्यासाठी विकासकांचा कारनामा !
खारफुटी संवर्धनाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली. महसूल, पोलीस, वन विभागा सह पालिकेची बघ्याची भूमिका. भर नागरी वस्तीत इंद्रलोक पोलीस चौकीच्या शेजारीच कांदळवनाची प्रचंड कत्तल. कांदळवनाची बेसुमार कत्तल व झाडांना विषबाधा करून मारले. भाईंदर पूर्वेला इंद्रलोक पोलीस चौकीला अगदी चिटकून असलेल्या मौजे. नवघर सर्व्हे क्रं. नवीन २० (जुना २१२) ह्या जागेत साधारण पणे ३० गुंठे जागेवर असलेले जुनी २५ ते ३० वर्ष अवेसीनिया मरीना प्रजातीची (मँग्रोव्ह ) जुन्या झाडांवर विषप्रयोग करून बेसुमार पणे कत्तल करत याठिकाणी मँग्रोव्ह नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाची बघ्याची भूमिका असल्याने तसेच आजूबाजूच्या परिसरात दिलेल्या बांधकाम परवानग्या व नवीन मंजूरीसाठी टाकलेल्या जागांना ५० मिटरचा बफर झोन न-लागण्यासाठी अनेक विकासकांचा कारनामा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा गुन्हे शाखेकडून तपासणीची मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.
cmomaharashtra_ mahaforestoffici...
Suggested Credits
Tags, Events, and Projects