facebook pixel
आयूष्य... आयूष्य खूप सूंदर आहे, जर ते समजलं तर... आणि खूप विद्रूप जर नाही समजलं तर. आयूष्य आपल्या सोबत न सांगता काहीच करत नाही. फक्त ते कधी आणि काय आणि कसं सांगतंय हे ज्याला समजलं त्याचं जगणं शांत होतं आणि खरंतर हेच आयूष्य न सांगताच आपल्या सोबत बरंच काही करून ही जातं. अश्या वेळी पश्चातापा शिवाय हाती काहीच राहत नाही. काय कमवायचं आणि काय गमवायचं हे आयूष्य नाही ठरवत तर ते आपण ठरवायचं असतं. आयूष्य फक्त मार्ग देतं, चालत आपण रहायचं असतं. पण आपण चालतोय ती वाट, तो रस्ता आपल्या साठी बरोबर आहे का, चांगला आहे का? हे आपण स्वतः ठरवायचं असतं. आयूष्याच्या या प्रवासात शेवटी फक्त काय कमवलं आणि जे कमवलं त्या साठी काय काय गमवलं फक्त याचाच जमाखर्च होतो. मग ती कमायी पैसा, माणसं, नाती, सूखाचे दिवस, भावनीक, मानसीक, शारीरीक समाधान या पेक्षा वेगळं असं काहीच नसतं. फक्त शेवटी हा जमा खर्च करताना डोळ्यांत समाधानाचं पाणि असावं, पश्चातापाचं नसावं. तरच जिवन जगलो असं होईल नाहीतर फक्त श्वास चाल होते पण जगणं कधी झालंच नाही असंच आयूष्य राहील. © निशब्द | Nishabd #निशब्दप्रेम #निशब्द #प्रेम #nishabd #मराठी #writersof...

 197

 197

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects