आज बालगंधर्व रंगमंदिरला “आमने सामने” हे नाटक पाहिले. काय कमाल सुंदर नाटक आहे. कथानक जेवढे ताकदीचे त्यालाच तोडीस तोड इथले कलाकार आहेत. शिवाय काय कमाल ऑडियंस होता, प्रेक्षक जेवढा चांगला तेवढी नाटकाला रंगत येते आणि तसेच काहीसे झाले. खरतर मराठी नाटकही हाऊसफुल होतेय हे खूप आश्वासक वाटले. केवळ हेच नाही रविवारची सगळी नाटके हाऊसफुल होती. काय सुंदर गोष्ट आहे हो! आपण इकडे सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टींचे वाभाडे काढतोय पण तिकडे आपल्या आधीची पिढी प्रेक्षक म्हणून आजही नाट्यगृहे हाऊसफुल करतेय. साहजिक तरुण प्रेक्षक संख्या कमी होती कारण त्यांना इन्स्टंटची सवय लागली आहे. एकदम खरं सांगू तर इंस्टाग्राम आल्यापासून माझही तेच झालेलं पण काल आयुष्यातले दुसरे नाटक पाहताना हे जाणवले की नवीन नवीन पुण्यात आलेले तेव्हा वाटायचे “नाटक वगैरे ही पुणेकरांचे चोचले आणि त्यांचीच मक्तेदारी” पण जेव्हा पुण्याला आपलेसे केले तसेतसे विचारही बदलले आणि पुण्यानेही आमच्यासारख्या निम पुणेकर मंडळींना कुशीत घेतले. त्याचाच परिणाम काल “आमने सामने” चा शो पाहिला. उत्स्फूर्त प्रेक्षकवर्ग आणि साधी अनुभवाच्या आधारे लिहिलेली मराठी कथा… उत्तम...
Suggested Credits
Tags, Events, and Projects