facebook pixel
आठवडा अखेर एवढाच सुंदर रेंगाळावा… आठवडा ज्याच्या भरोसे काढतो ते आठवड्याचे शेवटचे दिवस आले की नेमकं काय करायचे या गोंधळात आपण बऱ्याचदा दिवसाचा शेवट “ओव्हरथिंकिंग” करण्यात घालवतो. कृतीपेक्षा विचारांत गुंतून अधिक खोल जातो. पण आज न ठरवता अचानक शनिवारी १२ वाजेशिवाय डोळे न उघडणारी मी चक्क साडे आठला उठून बसले. सूर्या मामा आधीच आलेले त्यामुळे बाल्कनीत काल पाहिलेल्या कळ्या उमलल्या याकडे नजर गेली आणि सोबत कुंड्यांमध्ये वाढलेला कचराही दिसला आणि गेल्या आठवड्यापासून नर्सरीतून आणलेली जास्वंद तिला पर्मनेंट जागा कधी देते या प्रश्नाने स्वतःला सुकवून घ्यायच्या आत मी तिला बाटलीत सॉरी कुंडीत उतरवून तवटवीत केले. सगळी स्वच्छता झाल्यावर कळलं “बगीचा साफ करताना नकळत डोक्यातला कचराही साफ झालाय त्यामुळे विचारांवर फ्रेश पाणी पडलय. काही काळ तरी ओव्हरथिंकिंग पासून दूर राहण्याचा जुगाड झालाय” आजचा दिवस खरच जुन्या चित्रपटातील वीकेंड दाखवता तसा खास सुरू झालाय🥰🦋 #बगीचा #बाल्कनीच्यागोष्टी #balcony #balconygarden

 6k

 128

 14

 6k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects