लोकं काय म्हणतील ? या भितीमुळेच आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी करतच नाही. समय रैनाने सुद्धा काही ठरवून केले नव्हते. पण indias got latent मध्ये जे झाले आणि त्या घटनेने समय रैनाला जे बदलवले आणि या सगळ्या प्रवासात त्यात ज्याने जे जे फिल केले ते त्याच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओत खूप प्रामाणिकपणे मांडले. अनेकदा हसू आले. पण जेव्हा त्याच्यावर एफआयआर झाली तेव्हाची रात्र ज्या पद्धतीने घडली ती कॉमेडी पद्धतीने त्याने सांगितली तरीही डोळ्यातून पाणी आले. या सगळ्यात आईची झालेली अवस्था आणि वडिलांचे पहाडी उभे रहाणे डोळे भरून आणतात. शिवाय अपूर्वाच्या जोकचे भरभरून कौतुक करणे आणि कुठल्याही जोकवर हसल्यानंतर आपण का हसतो याची सायकोलॉजी सांगणे आणि एखादा कॉमेडियन का आवडतो याचे गणित मांडणे यातून त्याची बौद्धिक समज दिसते.
हा व्हिडिओ पाहताना सगळे इमोशन्स एकाचवेळी बाहेर पडतात. ऑफकोर्स काही जोक आपल्याला पटतही नाही. पण काही जोक इतके सटिक आणि पोट दुखेपर्यंत हसवतात. यापुढे जावून तो या व्हिडिओत त्याच्या मेंटल हेल्थबद्दल बोलतो. रोज होणाऱ्या एंग्जायटी (तणाव) याबद्दल स्पष्ट बोलतो. अनुभवावरून सांगितल्यामुळे नकळत कोणीतरी शह...
Suggested Credits
Tags, Events, and Projects