facebook pixel
बाटू केव्ज असं गुहेतील मंदिर जे एकतर अतिशय देखण्या रूपात आहे ज्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर एखादी स्वप्नातील जंगली गुहा पाहत आहोत आणि कुठलातरी चित्रपट शूट होतोय असे वाटते. त्याला स्वर्गातीत करते ती या गुहेच्या बाहेर उभी असलेली मुरगण स्वामी म्हणजेच कार्तिकेय स्वामींची मूर्ती! मलेशियात असलेले हे मंदिर मला अजिबात भारतापासून दूर गेल्याची जाणीवही करू देत नव्हते. एवढ्या लांब आलेलो असताना आपण भारताच्या एवढ्या जवळ वाटतो याचे मुख्य कारण आपण लोकसंख्येच्या आलेखावर मोठा उच्चांक गाठलाय त्यामुळे कितीही लोकं शहरात कामावर असले तरी त्याच्याच एवढी लोक सुट्ट्या घेऊन फिरायला आलेली असतात. त्यामुळे केवळ देशाच्या नाही तर परदेशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला अनोळखी वाटणारच नाही. पण बाटू केव्ज निर्माण होण्याचे हे कारणच नाहीये. १८–१९ व्या शतकात भारतातून विशेषतः तमिळनाडू राज्यातून कामनिमित्त मोठ्या प्रमाणात लोक मलेशियात गेले. त्यांना गुहा या मुरुगन देवाच्या रुपासारख्या वाटल्या. म्हणून हिंदू धार्मिक स्थळ म्हणून या गुहेचा विकास झाला. आपण सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली लोकं त्यामुळे आपल्याला डोंगरी गुहा नवीन नाहीत...

 490

 13

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects