facebook pixel
VC- @adiityaa_19 खूपच सुंदर प्रयत्न👏 दादा गेल्यापासून दादांबद्दल खूप ऐकायला, वाचायला मिळाले. आपल्या महाराष्ट्रात माणूस गेल्यावरच “मोठा” होतो, ते खर्या अर्थाने पाहिलं पण त्या सगळ्यात हा व्हिडिओ, त्यामागील आवाज काळजाला भेदून गेला. नव्या तंत्रज्ञानाचा वापर माणूस गेल्यावरही त्याच्याशी संवाद घडवून आणू शकतो. हो मान्य आहे गेल्यानंतर त्याचं “अस्तित्व” तंत्रज्ञानाने टिकवून ठेवता येत नाही. पण काही काळासाठी, काही माणसांसाठी प्रेरणेचा स्रोत टिकवून ठेवू शकतो. झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये इतरही लोक मृत पावली. अनेकजण म्हणतात मग केवळ दादांच्याच नावाने का टाहो फोडला जातोय. याचे उत्तर गेल्या दोन दिवसात मिळाले असेलच. दादा उपमुख्यमंत्री तर होतेच पण सत्तेत असू तर लोकांसाठी काम करू शकू हा त्यांचा मंत्र खूप फायद्याचा ठरला. वयाची सहासष्टी गाठलेला माणूस काळाच्या शर्यतीत नेहमीच स्वतःला टिकवून ठेवत आला आणि हेच कारण आहे आजची पिढी सुद्धा दादांसाठी हळहळत आहे. यापुढे जाऊन एक मोठा वर्गही आहे जो दादांसाठी रडतोय. असा वर्ग ज्यांची कुठलीतरी कामे दादांच्या भरोसे पुरी होणार होती. दादांच्या एका सहीने गोष्टी सोप्या होणार होत...

 10.3k

 375

 4

 10.3k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects