facebook pixel
गुहेतील आयुष्य जगण्याचा अनुभव देणारा अलंग मदन कुलंग ट्रेक ! एखाद्या ठिकाणाने आपल्याला बोलवायला लागते आणि तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जाणे शक्य होते नाहीतर प्लानिंग वगैरे गोष्टी फोल ठरतात. तसाच काहीसा प्रकार माझ्यासोबत अलंग मदन कुलंग (एएमके) गडाचा ट्रेक करण्याच्याबाबतीत घडला. बऱ्याचदा ठरवूनही मुहूर्त लागत नव्हता आणि त्यामुळेच गेल्या २-३ वर्षात ४-५ वेळा रतनवाडी गावात येणं झालं. ओघाने रतनगड, हरिश्चंद्रगड, भीमाशंकर फिरणे झाले पण एएमके ट्रेक नेहमीच भीतीमुळे असेल किंवा जास्त वेळ लागतो म्हणून असेल नेहमीच टाळला गेला. पण यावेळी २ आठवड्यापूर्वी रतनगडच्या ट्रेकदरम्यान अखेर ठरवलेच की हिवाळा संपायच्या आणि उन्हाळा लागायच्या आधी हा ट्रेक कुठल्याही परिस्थितीत करायचाच. त्यानुसार कदाचित एएमकेनेही मनाशी पक्के केले आणि सांगावा धाडला. ठरल्याप्रमाणे नियोजन झाले. सकाळी ७ वाजता ट्रेकचा श्रीगणेशा झाला. ही ट्रेकिंग कठीण श्रेणीतील असल्यामुळे गर्दी टाळून ट्रेकिंगसह शुटिंग करायची म्हणून शुक्रवारचा दिवस निवडला आणि शुक्रवारच्या सकाळी ४ मित्रांच्या सोबतीने स्वारी निघाली अलंगच्या दिशेने… दुर्ग त्रिकुट म्हणजेच ३ गड...

 482

 16

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects