“निर्णयांना वरदान आहे बदल घडवून आणण्याचं”
योग्य निर्णय घेण्याची इच्छा सगळ्यांची असते, पण कोणताही निर्णय निभावून नेण्याची ताकद माणसाला वेगळं बनवते. असंही निभावण्याचा “पर्याय” नसतोच. पण निर्णय चुकीचा निघाला तर स्वीकृती करून पुढे जाण्यात शहाणपण मानणारी काहीजण असतात तर काहीजण त्या निर्णयाच्या परिणामांनी पूर्णतः खचून जातात.
पण निर्णयाला वरदान म्हटलं कारण प्रत्येक छोटा निर्णय तुमचं आयुष्य बदलवत असतो.
बऱ्याचदा सामाजिकदृष्ट्या सर्वमान्य निर्णय घेणे सोपे असते. सर्वांना पटणारे आणि समाजाला रुचणारे निर्णय अनेकजण घेतात.
पण आपल्याला पाहिजे असलेले आयुष्य आपल्या त्या एका निर्णयातून साध्य होईल का ? हा प्रश्न विचारून आपल्या “निर्णयाची निवड” करायची. तेव्हा म्हणता येते की कठीण होतं सगळचं पण मनासारखे आयुष्य जगायला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. ते मी घेतले… आपल्याला पाहिजे तशा आयुष्याचे डिझाईन साध्य होण्यामागे तेच गूढ आहे.
सहजच स्वप्न पुरी होत नाही,
सगळे चकचकीत आयत्या पायऱ्यांनी जात असताना,
केवळ आपल्याला पाहिजे असलेल्या आयुष्याची वाट खडतर असूनही त्या दगडी वाटांनी एकटे जावे लागते! तिथे उभे असते आपल्या...
Suggested Credits
Tags, Events, and Projects