लयबद्ध ओघळणारी,
भेदभाव न करता लपेटणारी,
पाण्यासम आकार घेणारी,
कुठल्याही शरीराशी एकरूप होणारी,
जिच्या अंगी जाईल तिला मिठीत घेणारी,
जाड, बारीक, पातळशा शरीराला मायेने जवळ करणारी,
कुणाचे वळणदार शरीर अधिक सुडौल करणारी,
कुठल्याही खास कार्यक्रमाला रेलचेल असणारी,
याउलट जुन्या पिढीला बंधनात ठेवणारी,
जुन्या पिढीने बंधनात ठेवलेली,
अनेक सुत सांधून बनलेली,
निराळ्या रंगाची उधळण करून साठवणारी,
कुणासाठी आठवण, कुणाची कुणाबाबतची साठवण,
कुणासाठी प्रेम तर कुणासाठी बंधन!
कुणासाठी खरेदीचा बहाणा तर कुणासाठी ओझं!
पण कुणालाही टाळता न आलेली,
कुणाच्यातरी आयुष्यात सुटल्यामुळे महाभारत घडवणारी,
कुणाच्या तरी आयुष्यात सुखाची रात्र आणणारी,
कुणाला एकमेकांच्या जवळ आणणारी,
पहिल्या पगारातून आईसाठी भेट बनणारी,
त्याच्या नजरेत तिला खरी वाहवा मिळवून देणारी,
ती “साडी”🥻
तिचा प्रवास खूप मोठा आहे आणि विशेषत: विविध कारणांनी तो वाढतच गेला आहे.
अशा या साडी दिवसाच्या सर्व महिलांना आणि महिलांना साडीमध्ये खुलून दिसते म्हणणाऱ्या पुरुष मंडळींना साडी दिनाच्या शुभेच्छा 😅
- पूजा ढेरिंगे
#sareeday #saree #sareelove #sareedraping #sare...