पहाटे उठणं आताशा होत नाही. तुम्ही म्हणाल थंडी आहे पण नाही आदल्या दिवशीचे ओझे घेऊन झोपायची सवय लागल्यामुळे होत असावं. हे माझं एकटीचं नाही हा! आताच्या पिढीची ही खंतच आहे. पण ट्रेकिंगला किंवा फिरायला जायचे असेल तर अलार्म न लावता उठणारी पिढी आहे ही !
खरं सांगायचं तर आताच्या पिढीकडे करण्यासारखे खूप आहे. नवनव्या संधी आहेत आणि त्यामुळेच त्यांना एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा किडा चावला आहे. त्यामुळे ही दमछाक साहजिक आहे.
पण या धावपळीत एक गोष्ट वारंवार आणि जास्त प्रमाणात घडताना दिसू लागली ती म्हणजे लोकांचं ट्रेकिंग करणं आणि योगायोगे महाराजांचे गडकिल्ले पाहणं होऊ लागलंय… ते म्हणताय (म्हणजे जी लोकं जात नाहीत)
“रिल्सच्या जमण्यात फोटो, शुटिंगसाठी जाताय. त्यांना काय इतिहासाचे”
तेव्हा विचार केला, समजा ते गेले नसते तरीही बोललेच असते आणि जाताय तेव्हाही बोललेच जातेय. त्यामुळे ही दर्दी आणि गर्दींची गर्दी कोणीही थांबवू तर शकणार नाही. त्यामुळे आहे ते स्वीकारून त्यात सकारात्मक बाजू पाहणं गरजेचं आहे.
त्याच या काळात आम्ही रतनगडला जाऊन आलो. अनेकजण या गडाला सह्याद्रीचे रत्न म्हणतात. तिथे जाण्यापर्यंतचा ट्रेक ...
Suggested Credits
Tags, Events, and Projects