facebook pixel
“सफ़र पर अटल नहीं थी, हमसफ़र सही हो बस इतनी शर्त थी|” काही गोष्टी मनाकडे मागायच्या असतात. माझ्या प्रत्येक प्रवास माझा पार्टनर जास्त खास करतो. मलेशियातल्या दुसऱ्या दिवसात आम्ही ऑलमोस्ट २ दिवस जागे होतो. एवढी एनर्जी, पॉझिटिव्हिटी, चुकामुक होऊन हरवून सुद्धा अजिबात घाबरायला न होता त्यावर उत्तर काढण्याचा खटाटोप आणि एकमेकांना सापडल्यानंतर घट्ट मिठी! 🥰 म्हणजे त्या दोन क्षणात कळतं रे “आपला एकमकांवाचून किती जीव चाललाय…” प्रेम करणं, प्रेमात राहणं आणि प्रेमात “फिरणं” खास असतं. कारण लग्नानंतर एकेकटी फिरणारी ढिगानी जोडपी आहेत. पण ही आणि येणारी पिढी प्रेम वाटणारी आणि ते व्यक्त करणारी सुद्धा ठरणार आहे. त्यामुळेच माझा हट्ट असतो, भांडणं जशी मनसोक्त करता, मुक्तपणे तसंच दिलखुलास प्रेम केलं पाहिजे आणि व्यक्तही केलं पाहिजे. तसाच प्रयत्न आमचा असतो. त्या प्रेमाला फुलवत ठेवण्याचं इंधन म्हणजे “फिरणं” तुम्हाला माहिती नाही एवढी ताकद आहे फिरण्यात. कित्येकदा काही विखुरलेले संवाद पुरे होतात फिरण्यात… काही गैरसमज तर दूर होतात पण आपलाच व्यक्ती पुन्हा नव्याने उलगडू लागतो. जबाबदारी खांद्यावर असताना दिसणारा व्यक्ती आणि...

 487

 14

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects