facebook pixel
समाधानाची परीभाषा... जरी पसरला चोहीकडे, गर्द गडद अंधार सारा... पौर्णिमेचा चंद्र ही तूच, अमावसेचा तूच एक तारा... ऊन्हातली सावली तू, तूच त्या सावलीचा निवारा... एकांतातली चाहूल ही तूच, तूच वाहनारा मंद वारा... खोल तरीही शांत सागर, तूच त्याचा ओला किनारा... पापण्या अन मन भिजवनारा तू त्या अवखळ पाऊसाच्या धारा... ओठांवरचं निरागस हसू तू, तूच मनमोहक आनंद सारा... जगण्याची ओढ ही तू, तूच एकमेव श्वासांचा सहारा... अलगद अंगावरून फिरणाऱ्या मोर पंखाचा स्पर्श तू... कण कण रोमांचित करणारा, तू त्या स्पर्शाचा शहारा... भास तू आभास तू, जीवनाच्या पूर्णत्वाची आशा... स्वप्न तू, इच्छा तू, माझ्या समाधानाची तूच परिभाषा... © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #support #explore #poem

 1

 1

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects