facebook pixel
आवडेल मला... तू शब्द होणार असशील तर, त्याचा अर्थ होणं आवडेल मला... तूच होणार असशील प्रेम तर निस्वार्थ होणं आवडेल मला... तू पाणि होणार असशील तर, तृष्णा व्हायला आवडेल मला... तू होणार असशील राधा तर, कृष्णा व्हायला आवडेल मला... तू होणार असशील गूंतला जीव तर, समर्पण होणं आवडेल मला... होणार असशील देवरूप तर तूझ्या पायी, अर्पण होणं आवडेल मला... तू शरीर होणार असशील तर, तूझं मन होणं आवडेल मला... तू होणार असशील जगणं तर, त्याचं कारण होणं आवडेल मला... तू होणार असशील आरसा तर, तूझं प्रतिबींब होणं आवडेल मला... तू होणार असशील बरसत्या सरी, तर तूझ्यात चिंब होणं आवडेल मला... © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #support #explore #poem

 2

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects